
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता सोमवारी सायंकाळपासूनच जमा होऊ लागला आहे. 1 कोटी 77 लाख महिला या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत.
राज्यभरातील पात्र लाभार्थी महिला गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याचा हप्ता कधी जमा होतोय याची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता. आता मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 10 जून रोजी सामाजिक न्याय विभागाचा 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली होती.

























































