‘नीट’च्या परीक्षार्थींना दिलासा; पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
no-sunday-mega-block-on-western-railway-on-june-21-big-relief-for-neet-aspirants (1)

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमस यांसारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवारी, 21 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ‘नीट’ परीक्षा घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी लोकल सेवेचा कोणताही ब्लॉक न घेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सर्व उपनगरीय सेवा (1414 लोकल फेऱया) आठवडय़ाच्या कामकाजाच्या दिवसांच्या वेळापत्रकानुसार, तर एसी उपनगरीय सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘नीट’ परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.