
मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याचा प्रकार नुकताच घडला. या पार्श्वभूमीवर पुढे तयार होणाऱया राज्यातील सर्व बोगद्यांची पेंद्रीय सर्वेक्षण यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे ही मागणी केली आहे. भविष्यात अनेक रस्ते जोडण्याचे काम शासन हाती घेणार आहे. त्या अनुषंगाने पुढे तयार होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व बोगद्यांची केंद्रीय सर्वेक्षण यंत्रणेमार्फत तपासणी करून घ्यावी आणि मगच परवानगी द्यावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.




























































