एलन मस्क यांच्या वक्तव्याची चर्चा, मरण येईपर्यंत 500 अब्ज डॉलरचा कर भरेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क बर्याचदा मोठमोठे दावे करून सर्वांना चकीत करतात. आताही त्यांनी एक मोठा दावा केला आहे. आपल्या संपूर्ण जीवनात  500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक टॅक्स भरेन, असे त्यांनी म्हटले आहे. मस्क यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर ‘एक्स’ वर पोस्ट लिहीली आहे. त्यांनी अंदाज वर्तवला आहे की, त्यांची एकूण संपत्ती 852 अब्ज डॉलरच्या पार गेली आहे.

स्पेसएक्स रॉकेट आणि आर्टिफिशल इंटेलिजंट कंपनी ‘एक्सएआय’चे विलिनीकरण झाल्यापासून  मस्क यांच्या एकूण संपत्तीत वाढ झाली आहे. विलिनीकरणानंतर कंपनीचे मूल्य 1.25 ट्रिलियन डॉलर झाले आहे.  आतापर्यंत 10 अब्ज डॉलरपेक्षा अधिक टॅक्स भरला आहे. माझ्या मृत्यूपर्यंत 500 अब्ज डॉलरपेक्षा जास्त टॅक्स भरेन, असे मस्क यांनी म्हटले.

 मस्क यांची संपत्ती वेगाने वाढतेय

एलन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मस्क यांच्या नेट वर्थमध्ये एका दिवसात 84 अब्ज डॉलरची वाढ झाली. दोन कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या नव्या कंपनीमध्ये
मस्कची एकूण भागेदारी 43 टक्के आहे, जी 542 अब्ज डॉलरएवढी आहे. मस्क यांच्याकडे टेस्ला कंपनीचा 12 टक्के भाग आहे. त्याचे मूल्य 178 अब्ज डॉलर आहे.