दारू पिऊन आलेल्या पोलिसांचा रुग्णालयात भयंकर प्रकार, वॉर्डमधल्या कचरापेटीतच केली लघवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यातील रेवा सरकारी रुग्णालयात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन आलेले चारही पोलीस हे दारू पिऊन तर्राट होते. त्यातील एकाने तर रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये ठेवलेल्या कचरापेटीतच लघवी केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यानंतर या चारही पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे.

आरोपी लल्लू साकेत याची तब्येत खराब झाल्याने हे चारही पोलीस सोमवारी रात्री त्याला घेऊन रेवा सरकारी रुग्णालयात आले होते. तेथे लल्लूला दाखल करून घेतल्यानंतर हे चारही पोलीस बाहेर जाऊन दारू प्यायले व पुन्हा रुग्णालयात आले. त्यानंतर त्यातील एक पोलीस रुग्णांना राखीव खाटेवर झोपला होता. त्या चौघांमधील एका पोलिसाने वॉर्डमध्ये ठेवलेल्या कचरापेटीतच लघवी केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबचा व्हिडीओ व वृत्त दिले आहे.

या प्रकरणी उपनिरीक्षक निरिक्षक नर्मदा प्रसाद प्रजापती, हेड कॉन्स्टेबल उदयराज सिंग, हवालदार मनीष तिवारी व आणखी एका हवालदाराला निलंबीत करण्यात आले आहे.