राज्यात SIR नोंदणीला 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेच्या कार्यक्रमााला निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप या यादीत नाव नोंदणी केली नाही त्यांना आता 17 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. या निर्णयामुळे अद्याप मतदार यादीत नाव नोंदवता न आलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात येईल.

मतदारयादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदारयादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवडणूक आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.