
बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सोशल मीडियावर कायम सक्रिय आणि चर्चेत असते. ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नुसरत फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आता अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
नुसरत भरुचा केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. सोनेरी रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिने केलेल्या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 
चमकदार सोनेरी ड्रेसमुळे नुसरतने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. तिने दोन्ही हातात सुंदर अंगठ्या घातल्या आहेत.

या सुंदर ड्रेसवर तिने हलका मेकअप केला असून ती मोकळया केसांमध्ये दिसत आहे. तर कानात गोल्डन इअरिंग घालून तिने हे लूक पूर्ण केले आहे. 
नुसरत भरुचा तिच्या स्टायलिस्ट लूकसाठी प्रसिद्ध असून तिच्या फोटोंमळे ती कायम चर्चेत असते.

तिचे हे आकर्षक फोटो शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. 
नुसरत भरुचा या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत असून चाहत्यांनी तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.




























































