
राज्याचे पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परिवहन मंत्री, विभागप्रमुख अॅड. अनिल परब, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, विभाग संघटिका रजनी मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले येथे सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
स्वच्छता अभियान, शाखा क्रमांक 84 च्या वतीने वृक्षरोपण, शाखा क्र. 85 च्या वतीने रक्तदान शिबिर, शाखा क्रमांक 86 च्यावतीने आरोग्य शिबीर, शाखा क्रमांक 88 च्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन विधानसभा संघटक सुभाष कांता सावंत यांनी केले आहे. महिला विधानसभा संघटक रूपाली शिंदे, समन्वयक नितीन डिचोलकर, शाखाप्रमुख नरेश कांता सावंत मेहनत घेत आहेत.

































































