नागपूर येथे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पाच दिवसापासून आमरण उपोषण; पाठिंबा देण्यासाठी वणी येथे रस्ता रोको आंदोलन

>> प्रसाद नायगावकर

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी वामनराव चटप व इतर कार्यकर्ते 27 डिसेंबरपासून नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषणाला बसले आहेत. तसेच ॲड सुरेश वानखेडे व मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा कार्यालयासमोर चटप यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू आहे.सतत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे काही कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ॲड वामनराव चटप यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी वणी येथे रेल्वे फाटकावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ रस्ता वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या आंदोलनात प्रा पुरुषोत्तम पाटील,बाळासाहेब राजूरकर,राजू पिंपलकर,देवराव धांडे,अजय धोबे, नामदेव जनेकर,मुक्तानंद भोंगळे,संदीप गोहोकर,होमदेव कणाके,देवा बोबडे,कलाबई क्षीरसागर,धीरज भोयर,दिनेश रायपूरे,राकेश वराटे,अलका मोवाडे,दत्ता डोहे,संकेत खीरटकार,मंगल तेलंग, दशरथ पाटील,अक्षय कवरासे,रितेश बलकी,कृष्णराव भोंगळे,आयुब शेख,मजुषा तिरपुडे,कमलेश भगत,संजय सोमलकर,शशिकांत बोढे,काशिनाथ देऊळकर,प्रभाकर वुईके, सुमनताई जनेकार,बेबीताई पिंपलशेंडे,सुषमा पाटील,नितेश तुरानकर,सुजित गाताडे,चंद्रकांत दोडके,मारोती मोवाडे यासह विदर्भवादी उपस्थित होते.