
अस्वच्छ व आरोग्याला घातक ठरेल अशा परिस्थितीत चणा भंडारचे दुकान चालविणाऱ्या मुलुंड येथील दुकानदाराला एफडीएने दणका दिला. गुप्ता चणा भंडार असे त्या दुकानाचे नाव असून त्या दुकानातून 114.2 किलो वजनाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
मुलुंड पश्चिमेकडील गौतम नगर परिसरात गुप्ता चणा भंडार नावाचे दुकान आहे. त्या दुकानात स्वच्छता पाळली जात नसून अस्वच्छ वातावरणात नागरिकांना अन्नपदार्थ विकले जात असल्याची एफडीएच्या विशेष पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार त्या पथकाने त्या चणा भंडारवर छापा टाकला. त्यावेळी तेथे अस्वच्छ व आरोग्याला घातक ठरेल अशी परिस्थिती आढळून आली. त्यामुळे पथकाने तेथील 114.2 किलो वजनाचा अन्नसाठा जप्त केला. त्यात सुकी पाणीपुरी, बारीक शेव, सुकी शेवपुरी, भाजलेला चणा, मुरमुरे, हिरवे वाटाणा याचा समावेश आहे.





























































