FIFA World Cup 2026 – दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास, दक्षिण कोरियाला नमवत प्रथमच बाद फेरीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड कपच्या दहा दिवसांपूर्वीही हे निश्चित नव्हते की, दक्षिण आफ्रिकेचा संघ मेक्सिकोमध्ये जाणार की नाही. पण त्यांनी वर्ल्ड कपमध्ये पाऊल ठेवले आणि इतिहास रचला. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच त्यांनी बाद फेरीत प्रवेश करत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. ‘अ’ गटाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दक्षिण कोरियाला 1-0 ने पराभूत केले. या महत्त्वपूर्ण विजयामुळे दक्षिण आफ्रिका गटाच्या क्रमवारीत दुसऱया स्थानावर पोहोचली आहे, मात्र या निसटत्या पराभवानंतर दक्षिण कोरिया तिसऱया स्थानावर घसरला आहे. दोन्ही संघांमधील सामना अटीतटीचा होता.

सामन्यातील एकमेव आणि निर्णायक गोल दुसऱया हाफमध्ये झाला. दक्षिण आफ्रिकेच्या थापेलो मासेकोने सामन्याच्या 63 व्या मिनिटाला गोलपोस्टमध्ये चेंडू टाकून आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दक्षिण कोरियाने बरोबरी साधण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत बचावाने त्यांना सामन्याच्या शेवटपर्यंत रोखून धरले आणि विजय मिळवला.