
हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या पावसाने दाणादाण उडवली. शहरातील पंजागुट्टा, अमीर पेटा, एसआर नगर, हायटेक सिटी, मादापूर आणि कोंडापूर भागात पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. विविध रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. पाणी तुंबल्याने दुर्गा तलाव ब्रिजवर एक तासाहून अधिक वेळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली, तर मुसळधार पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला. बांदलागुडा येथे 15 वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला तर छटा बाजार येथे स्लॅब कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हैदराबादमध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी 76 झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली.





























































