पाच वर्षात पहिल्यांदाच असं घडलं; विराटनं गमावलं, रोहितनं पछाडलं, रूटनं कमावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन कसोटीत विराटला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आयसीसी क्रमवारीमध्ये त्याला नुकसान होत आहे.

बुधवारी आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ताज्या क्रमवारीत विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली असून तो पहिल्या पाच खेळाडूंमधून बाहेर फेकला गेला आहे. विराट कोहली सध्या सहाव्या स्थानावर असून रोहित शर्माने त्याला पछाडत पाचव्या स्थानावर कब्जा केला आहे. लीड्स कसोटीमध्ये रोहित शर्माने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते, तर लॉर्डसमध्ये देखील त्याने पहिल्या डावात 83 धावांची खेळी केली होती. याचे फळ त्याला कसोटी क्रमवारीत मिळाले आहे.

INDvENG चौथ्या कसोटीसाठी विराटपुढे चार पर्याय, ‘या’ खेळाडूंवर टांगती तलवार

पाच वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

विराट कोहली गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीतील पहिल्या पाच खेळाडूंमधून बाहेर फेकला गेला आहे. इंग्लंडमध्ये पहिल्या तीन कसोटीतील पाच डावांमध्ये फलंदाजी करताना त्याला फक्त एक अर्धशतक ठोकता आले आहे. यामुळे कोहलीला 9 गुणांचे नुकसान सोसावे लागले. सध्या तो 766 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर पाचव्या स्थानावर पोहोचलेल्या रोहितचे 773 गुण झाले आहेत.

Photo – ओव्हलमध्ये विजयाची टीम इंडियाला 50 वर्षांपासून प्रतिक्षा, जाणून घ्या रेकॉर्ड

रुट नंबर वन

हिंदुस्थानविरुद्ध पहिल्या तिन्ही कसोटीमध्ये शतक ठोकणारा इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट ताज्या क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. सहा वर्षानंतर रुट पहिल्या स्थानावर पोहोचल असून या वर्षाच्या सुरुवातीला तो नवव्या स्थानावर होता. मात्र धावांचा रतिब घालत त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याचे पहिले स्थान बळकावे. क्रमवारीत आता विलियम्सन 901 गुणांसह दुसऱ्या आणि स्टिव्ह स्मिथ 891 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मार्नस लाबुशेन चौथ्या स्थानावर आहे.

INDvENG टीम इंडियात बदलाचे वारे, पदार्पणात 4 बळी घेणाऱ्या गोलंदाजाचा संघात समावेश

अश्विन नंबर दोनवर कायम

इंग्लंडविरुद्ध पहिल्या तीन कसोटीत संधी न मिळालेला फिरकीपटू आर. अश्विन याने आपले नंबर दोन स्थान राखले आहे. तर जसप्रीत बुमराहला एका स्थानाचा फायदा झाला असून तो पुन्हा टॉप 10 मध्ये आला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.