IPL 2020 : एक धडक बसली आणि ‘सनरायझर्स’च्या हातून सामना निसटला

srh-ipl

आयपीएल 2020 सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना खेळला गेला, जो आरसीबीने 10 धावांनी जिंकला. 5 विकेट पडल्यानंतर रशीद खान आणि अभिषेक शर्मा यांनी सनरायझर्स हैदराबादकडून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण एका भयंकर धडकेमुळे धावबाद झाल्याने संघाच्या आशा संपल्या. दोन्ही खेळाडूंची धडक झाल्याने आरसीबीला धावचीत करण्याची संधी मिळाली. अभिषेक शर्मा धावबाद झाला आणि राशिद खान बराच काळ पडून होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आल्याबरोबर राशिद खानने डाव सावरला होता. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. अभिषेक शर्मालाही सूर गवसला होता. पण दोन धावा करण्याच्या प्रयत्नात दोन्ही खेळाडूंची समोरासमोर धडक बसली. त्यावेळी चेंडू उमेश यादवच्या हातात होता. त्याने त्वरित यष्टीरक्षक जोश फिलिपकडे फेकला आणि त्याने सहज धावबाद केले.

IPL 2020 – पडीकलचे पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक; धवन, वॉर्नरला दिला ‘धोबीपछाड’

राशिद खान सुमारे 5 मिनिटे पीचवर पडून राहिला. फिजिओने येऊन रशीदला उभे केले. रशीद खानने पुन्हा फलंदाजीस सुरवात केली. पण अभिषेकची विकेट पडल्यानंतर हैदराबाद बॅकफूटवर आला होता आणि आरसीबी गोलंदाजांनी पुढचा मार्ग सुकर केला.

IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार

युवा देवदत्त पडिक्कल आणि अनुभवी एबी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकांनंतर युजवेंद्र चहलने केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे सोमवारी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. स्पर्धेतील पहिल्या शानदार विजयामुळे आरसीबीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या