
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद घेतले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सहा सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद एकाकडेच असतील तर जनतेला न्याय कसा मिळेल, अशा शब्दात जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला.
पालकमंत्री म्हणून त्या व्यक्तीला त्या जिल्ह्याचा अभ्यास करणं त्याचे प्रॉब्लेम समजून घेणं ते सोडवणं हे गरजेचं असतं. पण जर एकाच व्यक्तीकडेच जर सहा सहा पालकमंत्रीपदं असतील तर तो कसं त्याला न्याय देईल? त्यामुळे त्या जिल्ह्यातील नागरिकांवर अन्याय होणारच आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
”40 पैकी बरेच आमदार आम्हाला जर मंत्रीपद दिलं नाही तर आम्ही तुमची साथ सोडणार असं सांगून आले आहेत त्यामुळे या सरकारला मंत्रीमंडळ विस्तार करणं मुश्कील झालं आहे’ असा टोला देखील त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

































































