लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी जीवन संपवले, शहरात एकच खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, घटनेचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. संजीव सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांकडून घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात असून, आत्महत्येचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सोनवणे यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अधिकृत पोलिस तपासानंतरच घटनेबाबतची संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे.