
सामना ऑनलाईन । मुंबई
सकल ब्राह्मण समाजाकडून मंगळवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी 15 मागण्या मांडण्यात आल्या. अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने आपल्या मागण्यांसाठी येथे एकवटा. ‘एक ब्राह्मण नेक ब्राह्मण’, ‘जय परशुराम… जय, जय परशुराम’ या घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले.
दुपारी 2 च्या दरम्यान मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ब्राह्मण समाजाच्या समितीची एक बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य करू असे आश्वासन दिल्याची माहिती आयोजकांनी दिली.

































































