
राज्यातल्या सरकारी रुग्णालयांतील नर्सेसच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आज अखेर संप मागे घेण्यात आला. शासकीय रुग्णालयांतील नर्सेसनी 28 मेपासून बेमुदत संप पुकारला होता. संप मागे घेतल्यामुळे आता रुग्णसेवा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
नर्सेसची विनंतीवर आधारित बदली करण्यासह पदभरती, पदोन्नती इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील नर्सेसनी बेमुदत संप पुकारला होता. राज्यभरातील हजारो नर्सेस बेमुदत संपावर गेल्याने जे. जे. रुग्णालय, जी. टी. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयासह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. अनेक शस्त्र्ाक्रियादेखील रद्द करण्यात आल्या होत्या.

































































