भाजप सरकारने ज्ञानेश कुमार यांना तातडीने हटवावे – मनोज जरांगे पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने हटवून तिथे दुसऱ्याला नियुक्त करावे. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांची मिलीभगत आहे का, असा संशय बळावत आहे. गुंडगिरी आणि दहशत आता लोकांना सहन होत नाहीये, असा हल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना सरकारवर केला.

जर जनतेला नको असेल तर सरकार कसली वाट पाहत आहे? लोकशाही धोक्यात असताना सरकार एवढा विचार का करत आहे? असा सवाल जरांगे यांनी केला. भाजप ज्ञानेश कुमारचे प्रवत्ते आहेत का? तुम्हाला त्याने नोकरीवर ठेवले का, अशा प्रश्नांची सरबत्तीही जरांगे यांनी केली.