
अभिनेता मिलिंद सोमण हा कायम त्याच्या व त्याच्या पत्नीच्या वयातील फरकामुळे ट्रोल होत असतो. मात्र हे दोघेही जगाकडे दुर्लक्ष करत आपले आयुष्य जगत आहेत. मिलिंद हा अंकिताच्या दुप्पट वयाचा आहे. मात्र या दोघांमधील केमिस्ट्री ही जबरदस्त असते.
नुकताच मिलिंदने अंकिताला किस करत असतानाचा एक फोटो सोशल मीडीयावर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो चाहत्यांना आवडला असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रीया दिल्या आहेत. पेटा या प्राणीमित्र संस्थेसाठी फोटोशूट करत असताना त्यांनी हा फोटो काढला आहे.
काही दिवसांपूर्वी केलेले न्यूड फोटोशूट
मिलिंद सोमण याचा 4 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. त्या दिवशी त्याने पत्नीसह गोव्यात सेलिब्रेशन केलं. त्यावेळी त्याने गोव्याच्या किनाऱ्यावर विवस्त्र धावत असतानाचा एक फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. हा फोटो त्याची पत्नी अंकिता हिने काढला होता. त्याला कॅप्शन देत त्याने, 55 अँड रनिंग असं लिहिलं होतं. त्या फोटोवरून गोव्यात त्याच्याविरोधत तक्रार दाखल झाली होती.
या आधीही मिलिंद अडकला होता वादात
फिटनेसविषयी जागरुकता निर्माण करण्यात अग्रेसर असलेला मिलिंद यापूर्वीही एकदा वादात अडकला होता. एका बुटांच्या जाहिरातीत नग्न फोटो टाकल्यामुळे मिलिंद सोमण आणि मधु सप्रे या दोन मॉडेल्सना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.




























































