
देशभरातील मोबाईल रिचार्च 12 ते 15 टक्क्यांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ पुढील 3 ते 4 महिन्यांत होणार असल्याची माहिती सेंट्रम इन्स्टिटय़ूशनल रिसर्च रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. टेलिकॉम कंपन्या शुल्कामध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ करणार असून यामध्ये तीन खासगी कंपन्या जिओ, एअरटेल व व्होडाफोन-आयडिया आणि एक सरकारी म्हणजेच बीएसएनएल कंपनीचा समावेश आहे.






























































