
राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. अवघ्या दोन दिवसांत राज्यातील एपूण 7 हजार 820 एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने एसटी महामंडळाचे जवळपास 2.29 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
राज्यातील अनेक भागांत दरड कोसळणे, रस्त्यावर झाड उन्मळून पडणे, रस्ता पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे राज्य परिवहन महामंडळाने शेकडो एसटी फेऱ्या रद्द केल्या.
रविवार
3,601 फेऱ्या रद्द
69.97 लाखांचे उत्पन्न बुडाले
सोमवार
4,219 फेऱ्या रद्द
1.60 कोटींचे उत्पन्न बुडाले
एकूण फेऱ्या रद्द – 7,820
बुडालेले उत्पन्न – 2.29 कोटी




























































