जलालाबाद नव्हे भगवान परशुराम पुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिह्यातील जलालाबाद तालुक्याचे नाव बदलण्याला मंजुरी देण्यात आली असून आता यापुढे जलालाबाद शहराचे नाव बदलून भगवान परशुराम पुरी असे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवर नाव बदलण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील कालीदास स्थित येथील सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत 27 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.