
दादर येथील ऐतिहासिक संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची संपूर्ण दुरूस्ती करण्यात येणार आहे. याबाबत शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे.
दादर पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज पार्प परिसरात स्मृतिदालनाच्या दूरवस्था झाल्यामुळे ऐतिहासिक वारशाचा अवमान होत असून देखभाल व सुशोभीकरणाच्या असलेल्या शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचे सांगत तुटलेले सिलिंग, छताला गळती असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्त्तरात म्हटले आहे की, या दालनाच्या वास्तूचे मे 2024 आणि मार्च 2026 मध्ये संरचनात्मक लेखा परीक्षण करण्यात आले आहे. यानुसार सदर दालनाच्या संपूर्ण वास्तूची दुरुस्ती सुचवण्यात आली आहे.





























































