१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना विनोद पवार । पिंपरी

परदेशातील स्मार्ट सिटींमध्ये राबविण्यात येणारा ‘सायकल शेअरिंग’ हा उपक्रम पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत राबविण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोडला आहे. त्यासाठी पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर येथील २८ ठिकाणांचा अभ्यास केला जाणार आहे. या उपक्रमासंदर्भात जनजागृती करून नागरिकांची मतेही जाणून घेतली जाणार आहेत. त्यानंतरच या उपक्रमाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

शहरातील दररोजची वाढत जाणाऱ्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ‘बाईक शेअरिंग’ हा उपक्रम शहरात राबविण्याबाबत महापालिकेचा अभ्यास सुरू आहे. सध्या पुणे शहरातही प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू आहे. युरोपियन देशात बहुतांशी शहरात तसेच जगभरातील ‘स्मार्ट सिटीं’मध्ये ‘बाईक शेअरिंग’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमामुळे वाहतूक समस्या सुटण्यास मदत होते. प्रदूषण कमी होते. रस्ता रुंदीकरण आणि रस्ते बांधण्यासाठी खर्च कमी होतो. बाईक शेअरिंगमुळे अल्पदरात प्रवास करता येतो. याशिवाय हा उपक्रम पर्यावरणपूरक आहे. वाहतुकीवर नियंत्रण करणे सोपे जाते. मोठ्या गाड्यांना जागा जास्त लागते. तर सायकलला अतिशय कमी जागा लागते. देखभाल-दुरुस्तीचा खर्चही अतिशय कमी आहे. या उपक्रमाचा सर्वाधिक फायदा शहरातील कष्टकरी, कामगार वर्गाला, विद्याथ्र्यांना होणार आहे. ज्यांना थोडेच अंतर जायचे आहे, त्यांना सायकलचा उपयोग होणार आहे. त्यातून पैसेही बचत होईल. याशिवाय शारीरिक तंदुरुस्ती वाढेल.

१० मिनिटांच्या पायी अंतरावर स्टॅण्ड

  • ह या उपक्रमांअंतर्गत मोबाईल अ‍ॅपही, वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. वेबपोर्टल आणि अ‍ॅप असणाऱ्यांकडे कोणत्या स्टॅण्डवर किती सायकली सध्या उपलब्ध आहेत, अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. वाहतुकीची सोय नाही, अशा ठिकाणी २ किलोमीटर अंतरावर स्टॅण्ड असणार आहे. नियमाप्रमाणे ५ ते १० मिनिटांच्या पायी अंतरावर स्टॅण्ड असणार आहे. तर, अंतराचे क्षेत्रफळ १० चौरस किलोमीटर असणार आहे. या सायकलला कॅरिअर, बास्केट, गिअर, लाइट, जीपीएस यंत्रणा आहे. प्रत्येक स्टॅण्डवर दरपत्रक लावण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षातून व्यवस्थेवर नजर ठेवली जाणार आहे.

अ‍ॅटोमॅटिक लॉविंâग सिस्टीम

  • शहरात हा उपक्रम राबविण्यासाठी ठिकठिकाणी सायकल स्टॅण्ड तयार करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने उड्डाणपुलाखाली, रस्त्याकडेला स्टॅण्ड उभारण्यात येणार आहेत. या सायकल खास डिझाईन केलेल्या असणार आहेत. त्यामुळे त्या चोरीला जाऊ शकणार नाहीत. या सायकलींना संपूर्ण अ‍ॅटोमॅटिक लॉविंग सिस्टीम पुरविण्यात येणार आहे. व्रेâडिट कार्ड टाकल्यानंतर हे लॉक उघडणार आहे. या यंत्रणेत सायकल वापरणाNयाला ओळखपत्र देण्यात येणार आहे. याद्वारे इलेक्ट्रॉनिक टॅग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशाने सायकल कोणत्या स्टॅण्डवरून घेतली आणि कोणत्या स्टॅण्डवर सोडली, हे अचूकरीत्या ओळखता येणार आहे. प्रत्येक स्टॅण्ड, सायकलचालक आणि स्टॅण्डला नियंत्रित करणारा हे सर्वजण एकमेकांशी जोडले जाणार आहेत. ज्या स्टॅण्डवर सायकलची कमतरता असेल त्याठिकाणी तत्काळ दुसऱ्या स्टॅण्डवरील सायकली ट्रकमधून पोहोच केल्या जाणार आहेत. लोकांच्या मागणीनुसार या स्टॅण्डचे आकारमान लहान-मोठे केले जाणार आहे.

पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर येथील जागांचा अभ्यास

  • ‘बाईक शेअरिंग’ हा उपक्रम राबविण्यासाठी सध्या शहरातील पिंपळे-गुरव आणि पिंपळे-सौदागर येथील महत्त्वाच्या २८ ठिकाणांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. दोन्ही ठिकाणांचा सव्र्हे केल्यानंतर या उपक्रमाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. पोस्टर, फ्लेक्सद्वारे जाहिरात, चित्रपटगृहे, सोशल मीडियाद्वारे लोकांना महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. त्यानंतर खरेच या उपक्रमाची गरज आहे का? याबाबत नागरिकांची मते जाणून निर्णय घेतला जाणार आहे. या उपक्रमासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.