शिवसेनेने सादर केलेली प्रतिज्ञापत्रे बोगस नाहीत! कोपरगावात चौकशीनंतर पोलिसांचा निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शिवसैनिकांनी दिलेली प्रतिज्ञापत्रे बोगस नसून, ती अधिकृत असल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला. कोपरगावात तपासासाठी आलेल्या मुंबई क्राइम ब्रँचच्या पोलीस पथकाने आज प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी नगर जिल्ह्यातून हजारो शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रे दिली. कोपरगावात जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेला उत्स्पूâर्त प्रतिसाद मिळाला होता. झावरे यांनी ही शपथपत्रे शिवसेना पक्ष कार्यालयाकडे सुपूर्द केली होती.

या प्रतिज्ञापत्रांवर गद्दार गटाकडून आक्षेप घेण्यात आल्यामुळे प्रतिज्ञापत्रे तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. कोपरगावात तीन दिवसांपासून मुंबई क्राइम ब्रँचचे पथक तपासणी करीत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी तपासानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

मुंबई क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सानप म्हणाले, ‘‘ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञापत्रे दिलेली आहेत, त्या सर्व शिवसैनिकांना समक्ष बोलावून विचारपूस करण्यात आली. आम्हीच प्रतिज्ञापत्रे करून दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिज्ञापत्रांसोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून, खात्री करून घेतली आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्रे बोगस िंकवा खोटी आहेत, असे निदर्शनास आलेले नाही,’’ असे त्यांनी सांगितले.

आम्ही शिवसैनिक आहोत. जे करू ते समोरासमोर! आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रे दिलेली आहेत. पोलीस तपासात काहीच निष्पन्न झालेले नाही. प्रतिज्ञापत्रांवर आक्षेप घेणाNया गद्दारांचा चष्माच नकली असल्याचे समोर आले आहे.
– राजेंद्र झावरे, जिल्हाप्रमुख, नगर.