तुरुंगात जायला तयार, पण माफी मागणार नाही! सुषमा अंधारेंनी संस्कृतमध्ये पत्र लिहित नीलम गोऱ्हेंना ठणकावलं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना संस्कृतमध्ये पत्र लिहिले आहे. सुषमा अंधारे यांच्यावर उपसभापतींची बदनामी केल्याचा आरोप असून त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी असा प्रस्ताव विधानपरिषदेमध्ये मांडण्यात आला होता. याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना 8 दिवसांची मुदत देत दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले होते. मात्र सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.