कारागृहातील आरोपीला पोलिसांकडून मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

लुटमारीच्या गंभीर आरोपात धुळे शहरातील राहुल थोरात उर्फ टाल्या आणि संतोष शिंदे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ते जिल्हा कारागृहात बंदिवान आहेत. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी या दोघा संशयीतांनी थेट कारागृह आणि पोलिस प्रशासनावर आरोप केले. या प्रकरणी कुठेही दाद मागु नये असेही पोलिस धमकावतात असे म्हणत दोघांनी न्यायाधिशांकडे तक्रार केली.

न्यायालयाच्या आवारातच त्याच्या समर्थकांनी मोबाईल मध्ये मारहाणी नंतर शरीरावर निर्माण झालेल्या जखमांचे चित्रिकरण केले. हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायल केले. त्यामुळे कारागृह आणि पोलिस प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान, न्यायाधिशांच्या आदेशानुसार संशयितांना बेदम मारहाण का करण्यात आली याची चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात कारागृह अधिक्षक वैभव आगे यांनी पोलिस अधीक्षकांना वस्तुस्थिती सांगितल्याचा दावा केला आहे. कारागृह प्रशासनावर बंदिवानांनी केलेला आरोप हा केवळ दिशाभुल करणारा आहे. न्यायालयाच्या आवारातच त्या दोघांनी स्वतःच्या किरकोळ जखमांवर चुना आणि साबणाचा वापर करुन या जखमा मोठय़ा केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही असे कारागृह अधीक्षक आगे यांचे म्हणणे आहे.