तमिळनाडूत विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडू सरकार विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा दुपारच्या जेवणात चिकन बिर्याणी देण्याचा विचार सरकार करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी दिली.

राज्यातील शालेय भोजन योजनेच्या ऐतिहासिक प्रवासाचा उल्लेख करत ते म्हणाले की, राज्यातील शालेय भोजन योजना वेळोवेळी अनेक बदलांमधून गेली आहे. सर्वांत आधी जस्टिस पार्टीने या भोजन योजनेची सुरुवात केली होती. त्यानंतर कामराज सरकारने याला ‘मध्यान्ह भोजन योजने’चे अधिकृत रूप दिले. ज्याप्रमाणे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी जेवणात बदल केले, त्याचप्रमाणे आता आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी दिली जाणार आहे. तसेच सकाळी दिल्या जाणाऱ्या नाश्त्याच्या मेन्यूमध्येही बदल केला जाणार आहे.