उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह उपनगरांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, रेनकोट वाटप, दृष्टिहीन, दिव्यांग तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्या-शालेय वस्तूंचे वाटप व मोफत आरोग्य शिबीर यांसारखे उपक्रम राबवले. या उपक्रमांना सामाजिक संस्थांसह नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

शिवसेनेच्या वतीने जोगेश्वरी पूर्वेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि विभागातील नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. शिवसेना नगरसेविका शिवानी परब यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार अनंत (बाळा) नर, महिला विभाग संघटक शालिनी सावंत, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, स्वीकृत नगरसेवक कैलासनाथ पाठक, उपविभाग समन्वयक महेश गवाणकर, महिला उपविभाग समन्वयक प्रियांका आंधळे, उदय हेगिष्टे, अविनाश रासम आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने लालबाग परळमधील दहावी-बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठान (परळ) चे संस्थापक आनंद गांवकर, शिवसेना सचिव/संचालक सुधीर साळवी, आमदार महेश सावंत, नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी नगरसेविका भारती पेडणेकर, सुरेश काळे, मुकेश कोळी यांच्यासह नाना फाटक, संतोष कांबळी, प्रभाकर मोरजकर, प्रणव डामरे, रूपेश कोचरेकर, नामदेव ओटवकर, अमेय भालेकर, प्रफुल्ल गावकर, रवींद्र कांदळकर, प्रवीण वेंगुर्लेकर, प्रकाश जाधव, अभिषेक गवाणकर, सुवर्णा गुराम, नीलम मिरगळ, प्राची तळेकर, नीलाक्षी चेंदवणकर, वंदना राणे, मेघना सुर्वे आदी उपस्थित होते.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, वर्सोवा विधानसभा यांच्या वतीने 115 मोफत डायबिटीज तपासणी मशीनचे वाटप करण्यात आले. कक्ष संघटक रवींद्र चिले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभाग संघटक अनिता बागवे, आमदार हारून खान, संजय पावले, राजेश शेटये, रमेश मालवणकर, एकनाथ केरकर, सुबोध चिटणीस, सतीश परब, सुनीता घाडगे, अरविंद देशमुख, संजय पाटील, हेमंत मयेकर, मनोहर धामणे, सचिन आंबेकर, नीलेश पुरोहित, राजेंद कुडपकर, जयश्री टपके, सिद्धी भगत आदी उपस्थित होते.

शिवसेना अपंग सहाय्य सेना व सिद्धिविनायक अंध अपंग संस्थेच्या वतीने दादरच्या कमला मेहता अंध शाळेतील दहावी-बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा गौरव केला. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार महेश सावंत, नगरसेवक साईनाथ दुर्गे, विभाग निरीक्षक यशवंत विचले, शाळेच्या संचालिका वर्षा जाधव, अध्यक्ष सूर्यकांत लाडे, सुभाष कदम, सुरेंद्र लाड, प्रमोद जानकर, मोहन पाटील, मोहन लट्टम, सुधीर वाडेकर, विनोद गावकर, अनंत तरळ, नाना पुकळे, शशांक घाडीगावकर आदी उपस्थित होते.

शिवसेना वाळकेश्वर शाखा क्रमांक 219 तर्फे दहावी, बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाखाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखेत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, विधानसभा समन्वयक शिवाजी रहाणे, संघटक भेरुलाल चौधरी, सह समन्वयक प्रकाश मिसाळ, शाखा संघटक योगीता पेंढारकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे बळीराम मोसमकर आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 123 च्या वतीने दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले. नगरसेवक सुनील मोरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला गौरव सोहळा विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी साकीना शेख, स्नेहल मोरे, विलास पवार, युवराज साळेकर, आर जी हुले, दत्तात्रय निकम, संजय कदम, प्रतीक्षा पवार, शीतल ठोंबरे, नूतन खटावकर, जयश्री कोल्हे, विभूती सिंग, विद्या कदम, रत्ना माने आदी उपस्थित होते.