
रस्ते विकासासाठी पैसा दिल्याची फुशारकी मारणारे गद्दार आमदार प्रा. रमेश बोरनारे यांची चापलुसी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी भर सभेत चव्हाट्यावर आणली. संजय निकम यांनी बुरखा फाडल्यामुळे स्वयंघोषित ‘कार्यसम्राट’ आमदाराचा चेहरा बघण्यालायक झाला होता.
‘छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य शिबिर अभियान’ अंतर्गत शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी महाराज मंदिर परिसरात आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात महसूल विभागासह विविध योजनांशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन गद्दार आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जहाड, तहसीलदार सुनील सावंत जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी आपण आमदार निधीतून पाणंद रस्त्यांच्या कामासाठी निधी दिल्याची फुशारकी मारली. ही फुशारकी मारत असतानाच त्यांनी भाजप आमदाराला रस्ते विकासासाठी ७ कोटी रुपये तर आम्हाला साडेसहा कोटी रुपये देण्यात आल्याचे रडगाणेही गायले. हे सांगत असतान आमदार बोरनारे यांनी शिऊर सर्कलमध दोन रस्त्यांच्या कामासाठीही आपण नि दिल्याची थाप मारली.
संजय निकम यांनी भाषणच थांबवले
आमदार प्रा. रमेश बोरनारे धडधडीत खोटे बोलत असल्याचे पाहून शिवसेने जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी मध्येच त्यांचे भाषण थांबवले. विक कामाला निधी दिल्याचे भजन सांगत बसू नका, तुमचे पैसे अजून मिळाले नाही शिऊर सर्कलमधील रस्त्याच्या कामासाठी मी निधी दिल्याचे संजय निकम या ठणकावून सांगताच आमदार बोरनारे यांची बोलतीच बंद झाली.




























































