मतं चोरणारे लोक आमच्यापासून वाचू शकत नाहीत – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशाला माहिती आहे की मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरी घडवून आणतात आणि अमित शहा व पंतप्रधान मोदी त्यांना पाठिंबा देतात, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी आज गोवा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पक्षाचे जनसंपर्क अभियान असलेल्या ‘गोंय राखण यात्रे’मध्ये सहभागी झाले. यावेळी कार्यकर्तांना संबोधित करताना ते म्हणाले की, “मतं चोरणारे लोक आमच्यापासून वाचू शकत नाहीत.”

राहुल गांधी म्हणाले, “मी तुम्हाला एक रंजक गोष्ट सांगतो, माझ्यावर मानहानीचे ४५ पेक्षा जास्त खटले दाखल आहेत, ज्यामध्ये अमित शहा, मोदी आणि इतरांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. एकूण मिळून हे ४५ खटले आहेत. तरीही मी प्रत्येक मंचावरून सांगतो की नरेंद्र मोदी मतं चोरतात, आणि असे बोलल्याबद्दल माझ्यावर कधीही कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही. तुम्हाला माहिती आहे का का? कारण त्यांना भीती वाटते की जर त्यांनी विशेषतः मतचोरीबाबत कोणताही गुन्हा दाखल केला, तर ती एक मोठी कायदेशीर लढाई बनेल आणि ते स्वतःच त्यात अडकून पडतील.”

दरम्यान, राहुल गांधींनी दक्षिण गोव्यातील मडगाव येथे काँग्रेसच्या गोंय राखण यात्रेत सहभाग घेतला आणि पक्ष कार्यकर्ते व नेत्यांसोबत २ किलोमीटरपर्यंत पायी चालले.