टीप्स ः स्त्रियांमधील सर्वसाधारण समस्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीरात रक्त कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे रक्तात लोहाचे प्रमाण कमी होते. पौष्टिक आहार नसेल तर रक्तातील लोह कमी होऊ शकते. शरीरातील रक्त कमी झाले की अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी काय करायचे ते पाहूया…

  • शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे तर बीट रूट सर्वात चांगला पर्याय आहे. कारण बीटरूटमध्ये आयर्न, फोलिक ऑसिड, फायबर आणि पोटॅशियम हे सर्व योग्य प्रमाणात असते.
  • दोन चमचे तीळ दोन तास पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर पाणी गाळून त्याच्या पेस्टमध्ये 1 चमचा मध मिसळून ते दिवसातून 2 वेळा खाल्ल्यास रक्ताचे प्रमाण वाढते.
  • डाळिंबाने रक्तातील हिमोग्लोबिन भरपूर वाढते. कारण डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसोबत प्रथिने, कर्बोदके आणि फायबर असते. यामुळे शरीरात हिमोग्लोबीनचे वाढायला मदत होते.
  • साधारण तीन ते पाच अंजीर दुधामध्ये उकळवून किंवा अंजीर खाऊन दूध प्यायल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
  • संध्याकाळी दोन चिमूट हळद टाकून कोमट पाणी प्यायल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते.
  • जांभळाचा रस आणि आवळ्याचा रस समप्रमाणात घेऊन ते प्यायल्यास हिमोग्लोबिनचा स्तर काढतो.
  • क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही शरीरातील रक्त कमी होऊ शकते. यासाठी क जीवनसत्त्व असलेले खाद्यपदार्थ खा. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व भरपूर असते. चटणी आणि मुरंबा अशा कुठल्याही रूपात खा.
  • अश्वगंधाचे 1 ते 2 ग्रॅम चूर्ण आवळ्याच्या 10 ते 40 मिलीग्राम रसासोबत घेतल्यास हिमोग्लोबिन वाढते.
  • एक ग्लास पाण्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून त्यात 20 ते 25 सुकामेवा रात्री भिजत ठेवा. सकाळी गाळून ते पाणी प्यावे आणि सुकामेवा चावून खा. शरीरात रक्ताचे प्रमाण भरपूर वाढेल.