
घर फिरले की घराचे वासेही फिरतात याचा प्रत्यय सध्या पश्चिम बंगालमधील राजकारणाकडे पाहून येत आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. विधानसभेतील जवळपास 60 आमदार, लोकसभेतील 20 खासदारानंतर आता राज्यसभेतील खासदारही तृणमूलची साथ सोडताना दिसत आहे. गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बराईक यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे ते तिसरे राज्यसभा खासदार ठरले आहेत.
TMC Rajya Sabha MP Prakash Chik Baraik has resigned from membership of the Rajya Sabha.
In his resignation letter, he wrote: “I do hereby resign from the membership of Rajya Sabha, which may please be accepted with immediate effect. I convey my sincere gratitude to your… pic.twitter.com/VsQ6r7zze1
— IANS (@ians_india) June 11, 2026
प्रकाश चिक बराईक यांच्याआधी तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूलचे ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांनीही पक्षाची साथ सोडली. त्यानंतर प्रकाश बराईक यांनीही खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे तृणमूलला धक्का बसला आहे.
दरम्यान, प्रकाश बराईक यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे संख्याबळ आता 10 खासदारांवर आले आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाची ताकद कमी होणे हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक मोठा राजकीय फटका मानला जात आहे. तसेच येत्या एका आठवड्यात पक्षाचे आणखी तीन राज्यसभा खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसमधील विलीन होणार?
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर फुटीच्या उंबरठय़ावर असलेला ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममतांपुतसा प्रस्ताव ठेवल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.





























































