रुमीच्या निवडक गझला आणि रुबाईचे भाषांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेम, अध्यात्म आणि आत्मज्ञानाचा एक अद्भुत प्रवास मांडणाऱया रुमीच्या कवितांचा विशिष्ट चाहता वर्ग आहे. 13 व्या शतकातील पर्शियन कवी आणि सूफी तत्वज्ञान मांडणाऱ्या रूमीच्या कविता अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. इंग्रजीतून मराठीत अनुवादित झालेल्या रुमीच्या कविता आजपर्यंत आपण वाचत आलेले आहोत, परंतु थेट फारसीतून मराठीत अनुवादित रुमीच्या कवितांचे पुस्तक वॉल्डन प्रकाशनाद्वारे 17 एप्रिल रोजी पुण्यात प्रकाािशत होत आहे. अश्विन चितळे या हरहुन्नरी तरुणाने रुमीच्या कवितांचा ध्यास घेतला आणि हे पुस्तक साकारले गेले. ‘श्वास’ या पहिल्याच चित्रपटातून बालकलाकार म्हणून घवघवीत यश मिळवणारा अश्विन भाषा आणि इतिहासातही तितकाच रमतो. फारसी कवी रुमीचे आयुष्य लोकांपुढे मांडण्यासाठी अश्विन अनेक माध्यमांद्वारे वेगवेगळे प्रयोग करत आहे. याच प्रयत्नांमधून आकाराला आलेले ‘आकाशातून आलो आपण’ हे रुमीच्या निवडक कवितांचे थेट फारसीवरून केलेले मराठी भाषांतर आहे. ‘आकाशातून आलो आपण : रुमीच्या निवडक गझला आणि रुबाई’ हे अश्विनचे पहिलेच मराठी भाषांतर आहे. अशा नावीन्यपूर्ण प्रयत्नांची दखल घ्यायलाच हवी.