
सामना प्रतिनिधी। तुमसर
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांची सावली तसेच बाळासाहेबांच्या प्रत्येक निर्णयाला साथ देणाऱ्या व प्रत्येक शिवसैनिकावर आई सारखे प्रेम करणाऱ्या वात्सल्यमूर्ती स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
शहरातील पंचशील कार्यालय येथे शिवसेना, युवासेना व वाहतूक सेना तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्रा तर्फे माँसाहेबांचा प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख लालूजी हिसारिया, युवासेना तालुका अधिकारी संजू डहाके, वाहतूक सेना उपजिल्हा अध्यक्ष जगदीश त्रिभुवनकर, शिवसैनिक अमित एच. मेश्राम, युवासेना शहर अधिकारी प्रवीण गुप्ता, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष गुड्डू डहरवाल, शिवसेना उपशहर प्रमुख कैलास जलवाने, मनोज आथिलकर, सोनू आगाशे सह शिवसैनिक उपस्थित होते.
































































