रत्नागिरी -15 हजारांची लाच घेणारा आरोग्य सहाय्यक ‘एसीबी’च्या जाळ्यात

बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला देण्यासाठी कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोपी लोकसेवक शैलेश आत्माराम रेवाळे (वय 38 वर्षे) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 15 हजाराची लाच स्वीकारताना आज रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांच्या मालकांचे बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला मिळण्याकरिता तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी व त्याबाबतचे कामकाज पूर्ण करून ना हरकत दाखला देण्यासाठी आरोपीने 15 हजार रुपयांची मागणी केली. मागणी केलेले पैसे घेताना आरोपीस रंगेहात पकडण्यात आले. आरोपी लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, पोहवा. संतोष कोळेकर, पोहवा.विशाल नलावडे, पो. ना. दीपक आंबेकर, पो.कॉ. हेमंत पवार यांनी ही कारवाई केली.