मनसेच्या अविनाश जाधव विरोधात खंडणीचा गुन्हा; पाच कोटींची खंडणी मागितली

मनसेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव याच्यासह दोघांविरोधात एलटी मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी व कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका सराफाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोन्याच्या दागिन्यांचे क्यापारी शैलेश जैन  (55) यांच्या तक्रारीनंतर अकिनाश जाधव व वैभव ठक्कर यांच्याविरोधात भादंकि कलम 385, 143, 147, 323, 120ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जैन यांनी ठक्करला झवेरी बाजार येथील जे.के.ज्वेलर्सच्या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते; परंतु ठक्कर याने मनसेचे अविनाश जाधव, स्वतःचा चालक, अंगरक्षक व सहा ते सात जणांसह मिळून कट रचला. मग अविनाश जाधव व त्याच्या सहकाऱ्यानी जबरदस्ती कार्यालयात घुसून त्यांनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली, असे जैन यांच्या तक्रारीत म्हटले आहे.