
ज्येष्ठ वृत्तपत्र विव्रेते, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विव्रेते संघटनेचे माजी अध्यक्ष व बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेते संघाचे माजी सरचिटणीस हरिश्चंद्र पवार यांचे 12 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाच्या वतीने शुक्रवार, 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता लोअर परळ येथील श्रमिक जिमखान्याच्या बाजूला डिलाईल रोड, ना. म. जोशी शाळेजवळील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेला संघाचे अध्यक्ष व शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. तरी सर्व वृत्तपत्र क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, विविध वृत्तपत्र संस्थांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र विव्रेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराने मोठय़ा संख्येने उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन विश्वस्त विजय रावराणे, कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर आणि सरचिटणीस संजय चौकेकर यांनी केले आहे. संपर्क: 9819591150.
































































