‘टाइम’ मॅगझिनच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदींना स्थान नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या ‘टाइम’ मॅगझिनने जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग इ. यांची नावे आहेत. मात्र हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॉप 100मध्ये स्थान मिळालेले नाही.

या यादीमध्ये राजकीय, मुत्सद्दी तसेच जागतिक नेतृत्वाशी संबंधित अनेक नावे आहेत. यादीत पहिल्या स्थानी पोप लिओ आहेत. ट्रम्प हे चौथ्या स्थानी असून न्यूयॉर्कचे नवे महापौर झोहरान ममदानी हे सहाव्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे, नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शाह हे या यादीत टॉप 20मध्ये असून बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारीक रहमान यांचाही त्याच्या खालोखाल समावेश आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांना यादीत स्थान मिळालेले नाही.