मनुवादी रणनीती लोकसभेत यशस्वी झाली नाही, महिला आरक्षणावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कधीही विरोध केला नव्हता, असे स्पष्ट करतानाच 2024 च्या निवडणुकीतच हे आरक्षण लागू करावे, अशी आग्रही मागणी आघाडीने केली होती, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपला केवळ महिला आरक्षणाच्या नावाखाली आपल्या राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना करायची होती, असा आरोप त्यांनी केला आहे.

यशोमती ठाकूर यांनी पुढे असेही नमूद केले की, भाजपने आखलेली ही ‘मनुवादी रणनीती’ लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाली नाही. महिलांच्या हक्कांच्या नावाखाली स्वतःचे राजकीय हित जपण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला, मात्र विरोधी पक्षांनी हा डाव ओळखून तो हाणून पाडला आहे असे ठाकूर यांनी म्हटले आहे