
बिग बॉस मराठीचा सहावा सिझन प्रसिद्ध अभिनेत्री तन्वी कोलते ने जिंकला आहे. तन्वीने दीपाली सय्यद, विशाल कोटियन, राकेश बापट, अनुश्री माने यांना मागे टाकत बिग बॉस मराठीची ट्रॉफी पटकावली. घरात पहिल्या दिवसापासून अक्टिव राहिलेली तन्वी ही बिग बॉस च्या यंदाच्या सीझन च्या विजेतेपदाची तगडी दावेदार मानली जात होती.
विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते विचारत होते काय काम केलंस, काय नावं तेव्हा वाईट वाटायचे पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून”.

























































