
सोन्या-चांदीच्या किमतीनी गेल्या वर्षी मोठी झेप उच्चांक गाठला. आता त्या त्यांच्या उच्चांकावरून घसरल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. तरीही सोन्याचांदीची झळाळी कायम असून अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीची मागणी मजबूत आहे. या दिवशी २०,००० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा आहे.
सोन्याचा भाव अजूनही प्रति १० ग्रॅम १.५० लाखांपेक्षा जास्त आहे, तर चांदीचा भावही प्रति किलोग्रॅम २.५० लाखांपेक्षा जास्त आहे. असे असूनही, अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीची मागणी मजबूत आहे. अक्षय तृतीयेला २०,००० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा आहे. त्यामुळे दोन्ही धातू महागले असले तरी अक्षय तृतीयेला खरेदीचा ट्रेंड कायम आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने आणि चांदीचे भाव लक्षणीयरीत्या जास्त असूनही, ग्राहक अक्षय तृतीयेला उत्साह दाखवत आहेत. CAT च्या अंदाजानुसार, यावर्षी विक्री २०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सोन्याची अक्षय तृतीयेला खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सराफा बाजारात खरेदीत मोठी वाढ दिसून येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात अक्षय तृतीयेला अंदाजे १६,००० कोटी रुपयांची सोने-चांदीची विक्री झाली, तर यावर्षी ही विक्री २०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
चांदी आता तिच्या सर्वोच्च पातळीपेक्षा १.८१ लाखांनी स्वस्त झाली आहे, तर सोन्याच्या दरातही ४८,००० ची घसरण झाली आहे. २०२६ च्या अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव गेल्या वर्षीच्या अंदाजे १ लाख प्रति १० ग्रॅमवरून आता अंदाजे १.५८ लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढला आहे. चांदीचा भाव गेल्या वर्षीच्या ८५,००० प्रति किलोवरून आता २.५५ लाख प्रति किलोपर्यंत वाढला आहे. वाढलेल्या किमती असूनही मागणी कायम आहे.
लोक अधिकाधिक हलके दागिने, रोजच्या वापरातील डिझाइन्स आणि चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. याव्यतिरिक्त, सराफांकडून घडणावळीच्या शुल्कावर मिळणारी सूट आणि लहान सोन्याच्या नाण्यांवरील ऑफर्स ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहित करत आहेत. मात्र, वाढलेल्या दरामुळे यावर्षी बाजारात हलक्या वजनाच्या दागिन्यांना आणि लहान नाण्यांना जास्त मागणी दिसून येत आहे. त्यामुळे दर वाढले तरीही अक्षय तृतीयेला सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.



























































