
छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात असलेल्या वेदांता पॉवर प्लांटमध्ये झालेल्या बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. गेल्या चार दिवसात या दुर्घटनेत जखमी झालेल्या वीस जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
15 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास शक्ती जिल्ह्यातील सिंहितराई गावातील ‘वेदांता लिमिटेड’च्या पॉवर प्लांटमध्ये ब्लास्ट झाला. टर्बाइनकडे वाफ वाहून नेणाऱ्या बॉयलर ट्युबमध्ये हा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, अनेक कामगार गंभीररीत्या भाजले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला.
अद्याप 11 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


























































