तामीळनाडूमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 23 कामगारांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यात एका फटाका बनवणाऱया कारखान्यात भीषण स्फोट झाला. त्यात 23 कामगारांचा मृत्यू झाला असून सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अनेक जण ढिगाऱयाखाली दबले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विरुधूनगर जिल्ह्यात कट्टनारपट्टीच्या भागात वानजा फायरव्रॅकर्स या पंपनीत सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामागील कारण स्पष्ट झाले नाही. कारखान्यातील एका युनिटमध्ये स्पह्ट झाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे चार युनिट भस्मसात झाले. स्पह्ट झाला त्यावेळी कारखान्यात 30 कामगार काम करीत होते. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मलबा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बचाव पथकाने 19 कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांची ओळख पटवण्यात येत आहे. स्पह्ट एवढा तीव्र होता की, जवळपासच्या इमारतींना तडे गेले. तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेबाबत शोक संवेदना व्यक्त केली आहे.

गेल्या आठवडय़ातदेखील विरुधूनगरजवळ सत्तूर गावाजवळ एका फटाका कारखान्यात स्फोट झाला होता. त्यात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. तामीळनाडूमध्ये मोठय़ा संख्येने फटाका बनविण्याचे कारखाने आहेत. देशातील 80 ते 90 टक्के फटाका उत्पादन तामीळनाडूमध्येच होते.

चौकशीचे आदेश

स्पह्टामुळे कारखान्यातील इतर इमारतींचे नुकसान झाले आहे. आगीचे लोळ पसरल्यानंतर काही कामगारांनी पळापळ करून जीव वाचवले, मात्र काही जणांना ही संधीच मिळाली नाही. स्पह्ट झाल्यानंतर बराच वेळ इतर फटाकेदेखील फुटत होते. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. फटाके तयार करत असतानाच झालेल्या चुकीमुळे स्पह्ट झाल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी वर्तविली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.