नायर रुग्णालयात नवजात बालकांसाठी पीआयसीयू सेंटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळीच्या सहकार्याने नायर रुग्णालयात नवजात बालकांसाठी पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (पीआयसीयू) सेंटर उभारण्यात आले आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पीआयसीयू प्रकल्पासाठी रोटरी क्लबतर्फे उपलब्ध केलेल्या निधीतून युनिटचे नूतनीकरण व अत्याधुनिक उपकरणांची पूर्तता करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळीच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. पॉला मुखर्जी-गोयल यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प उभारण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मनीष मोटवानी व टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या हस्ते या पीआयसीयूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुनील सिरासलेवाला यांच्यासह डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.