
कामाच्या पहिल्याच दिवशी वृद्धाच्या घरी हातसफाई करून पळालेल्या केअरटेकरला एमएचबी पोलिसांनी अटक केली. श्रीधर म्हेत्रे असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार तरुणी ही बोरिवली येथे राहते. तिचे वडील आजारी असल्याने त्यांच्या देखभालीसाठी तिने एका कंपनीच्या माध्यमातून केअरटेकर ठेवला होता. तो केअरटेकर उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी श्रीधर तेथे कामासाठी आला. कामावर आल्यावर त्याने तक्रारदाराच्या वडिलांना अंघोळ घातली. व्यायाम करून घेतला. पाच मिनिटांत येतो असे सांगून तो निघून गेला. बराच वेळ झाल्यानंतर तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने घरातील साहित्याची तपासणी केली असता घरातील सोन्याची चेन व अंगठी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

























































