
सिंगापूरहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान चंदीगडला वळवण्यात आले. खराब हवामानामुळे विमानाचे चंदीगडमध्ये लँडिंग करण्यात आले. शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुखरुप उतरवण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे 6E-1014 विमान सिंगापूरहून दिल्लीला येत होते. मात्र दिल्लीत हवामानाची स्थिती खराब असल्याने विमानाचे लँडिंग शक्य नसल्याने ते चंदीगडकडे वळवण्यात आले. चंदीगडमध्ये विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. त्यानंतर एका तासाने विमान दिल्लीकडे रवाना झाले, असे विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले.

























































