सरकार आणि सत्ताधारी पक्ष राजकारणापलीकडे जात जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप 2014 मध्ये भविष्याची स्वप्न दाखवत सत्तेत आले आणि आता भूतकाळ उकरून काढत आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले. तसेच सरकार आणि सत्ताधारी पक्ष राजकारणापलीकडे जात जनतेने प्रश्न सोडवणार आहेत का? असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला.

आदित्य ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही अटीशर्तींशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. तसेच सरकार आणि सत्ताधारी पक्ष राजकारणापलीकडे जात जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत का? असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

तीन लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा क्षेत्राप्रमाणे बैठका झाल्या. पदाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली, कोणती पदे रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. तसेच येणारा SIR बाबतही चर्चा झाली. पुढील रणनीती आणि आंदोलन कसे करावे, हे विषय चर्चेला घेण्यात आले होते, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

आम्ही आमच्यासोबत असलेल्यांवर अंधविश्वास ठेवतो. आण्ही अंधभक्त नाही मात्र आमच्यासोबत असलेल्यांवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 2024 लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी प्रचार केला. त्यांना आम्ही मशाल या चिन्हावर निवडून आणले आहे. मतोश्रीवर झालेल्या बैठकीत काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काही ऑनलाईनने उपस्थित होते. त्यामुळे सर्व खासदरा आमच्यासोबत आहेत, असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्येही 20 खासदार तृणमूलचा वेगळा गट स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. ते स्रव कृतघ्न आहेत. ते ममदादिदींच्या वानावर जिंकले आणि आता उड्या मारून दुसरीकडे जात आहेत. आमचा पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रकरण चार साडेचार वर्षांपासून सुरू आहे. एकादा पक्ष फोडून वेगळा गच स्थापन करून पक्ष आणि चिन्ह चोरण्यात येते. न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे, या सरन्यायाधीशांच्या विधानाशी आपण सहमत आहोत. सध्या देशात तशी स्थिती दिसत आहे काय? यावर विचार करणे गरजेचे आहे. आपण सर्वात मोठी लोकशाही होतो आता तशी परिस्थिती दिसत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आम्ही 2019-20 साली केली होती, त्याला कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती नाव दिले होते. तसेच आम्ही कोणत्याही अटीशर्ती न लावता कर्जमुक्ती केली होती. त्यावर शेतकऱ्यांपर्यंत ती सुलभतेने पोहचली होती. तसेच आता केलेली कर्जमाफी ही उपकरा केल्यासारखी आहे. 85 लाख महिलांचे लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आणि मतं लाटण्यात आली. आता त्यांना अपात्र ठरवत आहेत. शेतकरी कर्जमाफी केल्यासारखे ते करत आहेत. त्यामुळे कोणत्याही अटीशर्ती न ठेवता कर्जमाफी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

रिव्हरफ्रंड प्रकल्पावर, वेताळ टेकडी यासारखे पुण्यातील विषयांवर आम्ही आवाज उठवत आहोत. शाश्वत विकास होच आमचे ध्येय आहे. वीजेचा पुरवा असताना लोडशेडिंग का होत आहे, पुरेसा पाणीसाठी आहे, तर पाणीकपात का करण्यात येत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता 2047 पर्यंत पुरेसे पाणी मिळेल, असे आश्वासन सरकार देऊ शकते.

सरकार आणि सत्ताधारी पक्ष राजकारणापलीकडे जात जनतेने प्रश्न सोडवणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. महागाई, पेपरफुटी, शेतकऱ्यांच्या समस्या यामुळे जनतेत रोष आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे विषय मांडत आहोत. सरकारविरोधी आंदोलन करत आहोत. विधानसभेत आवाज उठवत आहोत, असे त्यांनी सांगितले.

2014 साली अच्छे दिन आयेंग असे सांगत सत्तेत आले. अच्छे दिन लायेंगे साठी ते काहीही करत नाही. त्यावेळी ते भविष्यबाबत आश्वासन देत होते. आता ते भूतकाळ उकरून काढत आहोत. पंडित नेहरूंनी असे केले, सरदार असते तर… अशा जर तर ज्या गोष्टी ते करत आहेत. जनतेची दिशाभूल करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.