भिवंडीत सात रेल्वे मार्गांखाली वॉटरप्रूफ सबवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गिकांवर विविध विकास प्रकल्प राबवणाऱ्या मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) भिवंडी रोड स्थानकाजवळ अत्याधुनिक वॉटरप्रूफ पादचारी सबवेच्या रूपात आणखी एक महत्त्वपूर्ण बांधकाम प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. हा सबवे तब्बल सात रेल्वे मार्गांखाली तयार करण्यात आला असून तो कोणत्याही वातावरणात पादचारी आणि दुचाकीस्वारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल-वसई रोड मार्गावरील भिवंडी रोड स्थानकाजवळ अत्याधुनिक आणि जलरोधक (वॉटरप्रूफ) पादचारी सबवेचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे एमआरव्हीसीने सोमवारी जाहीर केले.